तराफा अपघातातील मृतांची संख्या ६६

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तराफा अपघातातील मृतांची संख्या ६६

मुंबई :तराफा अपघातात मृतांची संख्या शनिवारी ६६ वर पोहोचली. त्यापैकी १८ मृतदेहांची
ओळख अद्याप पटलेली नाही. ‘पी ३०५‘ तराफा( बार्ज) समुदात बुडाल्यानंतर नौदलाने
बचावकार्य, बेपत्ता असलेल्यांसाठी शोधमोहिम सुरू केली. शनिवारी संध्याकाळपर्यंत नौदलाने ६६
मृतदेह शोधले. पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार
संध्याकाळपर्यंत नौदलाने ६१ मृतदेह  मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यापैकी ४३ मृतदेहांची
ओळख पटली. त्यातील ४१ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. १८ मृतदेहांची ओळख
पटू शकली नाही. हे मृतदेह जेजे रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून ओळख पटावी
यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दोन ते तीन दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजले आहेत. शरीरावरील खुणा, दागिने, कपडे
आदींवरून ओळख न पटल्यास डीएनए जुळणी अखेरचा पर्याय असेल. त्यासाठी ओळख न
पेटलेल्या मृतदेहांचे डीएनए नमुने जतन करण्यात आले आहेत, असे चैतन्य यांनी सांगितले.
कप्तान राकेश बल्लव बेपत्ता
या अपघातास जबाबदार धरत येलो गेट पोलिसांनी ताराफेवरील कप्तान राकेश बल्लव
यांच्यावोरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. मात्र नौदलाने आतापर्यंत केलेल्या
बचावकार्य, शोधमोहिमेत ते सापडलेले नाहीत. पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार कप्तान बल्लव
बेपत्ता आहेत.
वरप्रदावरून मदतीसाठी संपर्क नाही
नौदलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चक्री वादळादरम्यान चार बोटी, जहाजांवरून
मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. त्यात वरप्रदा बोटीचा समावेश नव्हता. ‘पी ३०५‘ तराफेवरील
अधिकारी, कामगारांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू झाले तेव्हा वरप्रदावरील दोघांना
वाचविण्यात आले. त्यांच्याकडील चौकशीनंतर वरप्रदा बोटीवरील ११ जण बेपत्ता असल्याची
माहिती पुढे आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले.