विजयानंतर राज ठाकरेंचे आभार मानत एम.के. स्टॅलिन यांनी दिली ग्वाही, म्हणाले…

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विजयानंतर राज ठाकरेंचे आभार मानत एम.के. स्टॅलिन यांनी दिली ग्वाही, म्हणाले…

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव करीत तमिळनाडूमध्ये एम के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. या विजयाबद्दल एम के. स्टॅलिन यांना अनेक राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल(दि.२) तामिळनाडूत द्रमुकचा विजय स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, तुम्हीही प्राधान्य द्याल आणि राज्यांच्या स्वायत्तेबद्दल आग्रही रहाल, अशी आशा राज ठाकरे यांनी स्टॅलिन यांना शुभेच्छा देताना व्यक्त केली होती. त्यावर आता स्टॅलिन यांनीही राज ठाकरेंचे आभार मानले असून त्यांना एक ग्वाही दिली आहे.

स्टॅलिन यांना शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी, “तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हिच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्तेबद्दल आग्रही रहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन”,असं म्हटलं होतं. त्यावर स्टॅलिन यांनी, “राज ठाकरेतुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहेहो, माझ्याकडून भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांच्या स्वायत्ततेला प्राधान्य देणं सुरूच राहिल”, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.