तिरंदाज दीपिका कुमारीनं अमेरिकेच्या खेळाडूला चारली धूळ!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तिरंदाज दीपिका कुमारीनं अमेरिकेच्या खेळाडूला चारली धूळ!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज दीपिका कुमारीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावत अंतिम १६ मध्ये स्थान पटकवले आहे. तिने अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिसचा - असा पराभव केला आहे. ती आता पदकाच्या जवळ पोहचली आहे.

दीपिका कुमारीने  अमेरिकेच्या जेनिफरला फर्नांडिसचा पराभव केला. पहिला सेट दीपिकाने गमावला होता. दीपिकाने पहिल्या सेटमध्ये २५ गुण मिळवले होते. तर, फर्नांडिसने २६ गुण मिळवले होते. मात्र तिने दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेत २८ गुण मिळवले तर फर्नांडिसला २५ गुण मिळाले. तिसरा सेट देखील दीपिकाने जिंकला, यामध्ये तिला २७ गुण मिळवले तर, फर्नांडिसला २५ गुणच मिळवता आले.

२००९मध्ये युवा विश्वचषक स्पर्धेत १५व्या वर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या दीपिकाने मग २०१०च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके कमावली. परंतु २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ आपला प्रभाव दाखवू शकला नाही. मग पुढील चार वर्षांनी रिओमध्येही भारताने तोच कित्ता गिरवला. कारकीर्दीतील तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान नावावर असणाऱ्या दीपिकाला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु गेल्या पाच वर्षांत रांचीच्या दीपिकाची कामगिरी कमालीची सुधारली आहे. पाच विश्वचषक पदके तिच्या नावावर आहेत.