सहशिक्षणाच्या विरोधात तालिबानचा फतवा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सहशिक्षणाच्या विरोधात तालिबानचा फतवा

काबुल: तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आपले नियम फतवे लागू करायला सुरुवात केली आहे. हा पहिला फतवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. यात अफगाणिस्तानात मुली मुलांसोबत एकाच वर्गात बसणार नाहीत, असा आदेश काढला आहे. हा आदेश अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात तालिबानी अधिकाऱ्यांनी सरकारी आणि खाजगी महाविद्यालयांना दिला आहे. या संदर्भात शनिवारी महाविद्यालयाचे मालक, संस्थाचालक आणि तालिबानी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

सध्या हेरात प्रांतात खाजगी आणि सरकारी विद्यालयात जवळपास ४० हजार विद्यार्थी आणि दोन हजार शिक्षक आहेत. अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत संयुक्त शिक्षण प्रणाली सुरू होती. यात मुलं-मुली एकत्र बसून शिक्षण घेऊ शकत होती. मात्र यापुढे तालिबानी राजवटीत अशा शिक्षण व्यवस्थेस मान्यता नाही. मुलं-मुली यांच्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था असाव्या. या बैठकीत अफगाणिस्तान इस्लामिक अमीरातचे उच्च शिक्षण प्रमुख मुल्ला फरीद सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, संयुक्त शिक्षण बंद करायला हवे कारण ही व्यवस्था समाजातील सर्व वाईट प्रवृत्तीचे मूळ आहे. दरम्यान फरीदने एक पर्याय दिला आहे. यात मुलींना प्रौढ पुरुष जे गुणी आहेत. त्यांना महिलांना शिक्षण देण्याची परवानगी द्यावी. संयुक्त शिक्षणासाठी ना कुठलाही पर्याय आहे ना संधी. खासगी शिक्षण संस्था वेगवेगळ्या वर्गांचा खर्च उचलू शकणार नाहीत. त्यामुळे हजारो मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू शकतात.