शेफाली शाहचे दिग्दर्शन असलेल्या ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’चं पहिलं पोस्टर रिलीज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शेफाली शाहचे दिग्दर्शन असलेल्या ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’चं पहिलं पोस्टर रिलीज

अभिनेत्री शेफाली शहाने टेलिव्हिजनसह, चित्रपट, थिएटर आणि आता ओटीटी प्लेटफार्मवरून प्रेक्षकांचं कायम मनोरंजन केलंय. लवकरच शेफाली आपलीहॅप्पी बर्थडे मम्मीजीही शॉर्ट फिल्म घेऊन येत आहे. या लघुपटाची कथा शेफालीची असून त्याचे दिग्दर्शनदेखील तिनेच केले आहे. नुकतच सनशाइन पिक्चर्स सोबत या चित्रपटाचे पाहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

शेफालीने आपल्या सोशल मीडियावर देखील या शॉर्ट फिल्मचं पोस्टर शेअर करत आनंद व्य़क्त केलाय. तसचं या सिनेमासाठी चाहत्यांकडून तिने आशिर्वाद मागितले आहेत. “मी एका नवीन दिशेकडे झेप घेतली आहे. त्यामुळे तुमची साथ असू द्या.” असं शेफाली म्हणाली.

लघुपटाबाबत बोलताना शेफाली म्हणाली की, “ही आपल्या मधल्या सर्वांचीची गोष्ट आहे, जे आपले नाते, कुटुंब, घरामुळे ओळखले जात असतातहॅप्पी बर्थडे मम्मीजीचे कथानक एका महिलेचा भावनात्मक प्रवास आहे, ज्याच्यासोबत प्रत्येक महिला स्वतःला जोडून घेऊ शकते.” असं शेफाली म्हणाली.

शेफालीहॅप्पी बर्थडे मम्मीजीच्या निमित्ताने, एक अशी कथा पडद्यावर आणणार आहे ज्यामध्ये समान परिस्थितीतून जाणाऱ्या हजारों महिलांची कहाणी सामील आहे. शेफालीद्वारे दिग्दर्शित या लघुपटाचे चित्रीकरण मुंबईत करण्यात आले आहे. ‘समडेनंतर शेफाली दिग्दर्शित हा दूसरा लघुपट आहे. लवकरच शेफाली आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबतडार्लिंगस्मध्ये दिसणार आहे. ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजीचे हे पोस्टर शेफाली दिग्दर्शकाच्या खुर्चीतून आपल्याला काय खास देणार आहे याबद्दल उत्सुकता वाढवणारे आहे.