प्रत्येक नागरिकाने भारत जोडो आंदोलनाचे नेतृत्व करावे - पंतप्रधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प्रत्येक नागरिकाने भारत जोडो आंदोलनाचे नेतृत्व करावे - पंतप्रधान

नवी दिल्ली : येत्या १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे आपले मोठे भाग्य आहे की, आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाचे साक्षीदार आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केवळ सरकारचा नसून देशातील १३० कोटी जनतेचा उत्सव आहे. या निमित्ताने देशातील प्रत्येक नागरिकाने भारत जोडो आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांना केले आहे. तसेच कोरोना विषाणू संसर्ग अद्याप संपला नाही. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या सणासुदीच्या काळात कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी केले.  पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१४ रोजी रेडिओवरमन की बातकार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत असतात. आज त्याचा ७९ वा भाग होता.
मोदी पुढे म्हणाले की, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षासाठी देशाने शतकानु शतके प्रतीक्षा केली. यंदा १५ ऑगस्ट रोजी आपण एक अनोखा प्रयत्न करणार आहोत. या दिवशी शक्य तेवढे भारतीय राष्ट्रगीत गाण्याचा संस्कृती मंत्रालयाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीय गान डॉट कॉम तयार करण्यात आले आहे. या वेबसाइटच्या मदतीने राष्ट्रगीत रेकॉर्ड करता येईल. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्या क्षणी संपूर्ण देशाने जणू एकत्र येत आपल्या या योद्ध्यांना विजयी भव म्हटले. आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडियावर देखील ऑलिम्पिकमधील खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी #HumaraVictoryPunch कॅम्पेन सुरू झाले आहे. त्यात सर्वांनी सहभाग घेऊया, असे आवाहनही मोदी यांनी केले.
उद्या २६ जुलै रोजीकारगिल विजय दिवसआहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पाहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.  येत्या ऑगस्ट रोजीराष्ट्रीय हातमाग दिवसआहे. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच दिवशी १९०५ साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती. खादीची खरेदी करणे एकप्रकारे लोकसेवा आणि देशसेवाही आहे. त्या निमित्ताने आपल्यासाठी अशी एक संधी आहे. आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक हे काम करावे. आपण सर्वांनी ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू जरूर खरेदी कराव्यात, अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे.

मन की बात कार्यक्रमासाठी ७५ टक्के सूचना देशातील ३५ वर्षे वयोगटाखालील लोकांच्या येतात. त्यामुळे आपण आनंदित आहोत, असेही ते म्हणाले. देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी देश प्रथम या भावनेतून काम करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
राजकोटमधील लाईट हाऊस फ्रेंच तंत्रज्ञानाने बनविण्यात येत आहेत. ज्यात बोगद्याद्वारे अखंड काँक्रिट बांधकाम तंत्रज्ञान वापरले जात आहे. या तंत्रज्ञानाने बनविलेले घर आपत्तींचा सामना करण्यास अधिक मजबूत असेल.