वाढदिवसाच्या दिवशीच सोनाक्षी सिन्हा ट्रोल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वाढदिवसाच्या दिवशीच सोनाक्षी सिन्हा ट्रोल

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा आज वाढदिवस आहे. सोनाक्षीच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोनाक्षीला अनेक चाहते सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याने ती ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आली होती. मात्र काही नेटकऱ्यांना सोनाक्षीचं टॉप ट्रेण्डमध्ये झळकणं आवडलेलं दिसत नाही.

सोनाक्षी ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आल्यानंतर काही वेळेतच तिचे अनेक विदोनी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले आहेत. काही युजर्स सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर काहींनी मीम्स शेअर करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर तिच्यावर बॉडी शेमिंग कमेंट केल्या आहेत. सोनाक्षीला वाढदिवसाच्या दिवशी स्वत:ला ट्रोल होताना पाहून कसं वाटतं असेल यावरही अनेक नेटकऱ्यांनी मीम्स शेअर केले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी सोनाक्षी सिन्हा टॉप ट्रेण्डमध्ये येण्यास पात्र नसल्याचं म्हणत मीम्स शेअर केले आहेत. तर एक युजर म्हणालाय, “जेव्हा सोनाक्षी सिन्हाचा बर्थ डे असतो आणि ती टॉप ट्रेण्डमध्ये असते तेव्हा भारतीयांच्या अशा प्रतिक्रिया असतात.”