अमूल दुधाच्या किंमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमूल दुधाच्या किंमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ

देशात करोनाचं संकट असताना आता सामन्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर त्याचे परिणाम आता इतर वस्तूंवर दिसू लागले आहे. आता उद्यापासून म्हणजेच जुलैपासून अमूल दूध रुपये प्रति लिटर महाग होणार आहे. संपूर्ण देशात नव्या किंमतीनुसार दूध उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर अमूलच्या सर्व प्रोडक्टवर दोन रुपयांची वाढ होणार आहे. यात अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रीम या प्रोडक्टचा समावेश आहे. दीड वर्षानंतर अमूलने आपले दर वाढवले आहेत. नवे दर लागू झाल्यानंतर अमूल गोल्ड ५८ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसहित अन्य राज्यांना दूध महाग मिळणार आहे.

अमूल दुधाच्या किंमतीत उद्यापासून रुपयांनी वाढ होणार आहे. नव्या किंमती अमूल गोल्ड, ताजा, शक्ती, टी स्पेशलसह गाय आणि म्हैशीच्या दुधावरही लागू होणार आहेत. जनावरांचं खाद्य महागलं आहे. त्याचबरोबर पॅकेजिंगची किंमतीही ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच परिवहन, वीज यांच्या किंमतीही ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे”, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.