मैदानाच्या मध्य भागातून मारला गोल, ठरला Euro कपच्या इतिहासातील सर्वात खास गोल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मैदानाच्या मध्य भागातून मारला गोल, ठरला Euro कपच्या इतिहासातील सर्वात खास गोल

युरो कपच्या यंदाच्या मौसमातील सर्वोत्तम गोल्सपैकी एक गोल सोमवारी खेळण्यात आलेल्या स्कॉटलंड विरुद्ध चेक प्रजासत्ताकदरम्यानच्या सामन्यात पहायला मिळाला. ‘गटातील या सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या संघाने स्कॉटलंडवर - असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्कॉटलंड संघ दबावात खेळताना दिसून आला. चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक शिकने ४२ आणि ५२व्या मिनिटाला दोन अफलातून गोल नोंदवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे ५२ व्या मिनिटाला पॅट्रिकने केलेला गोलची थेट युरो कपच्या रेकॉर्डबुकमध्ये नोंद झाली. सामन्यातील दोन गोलपैकी शिकने ५२व्या मिनिटाला नोंदवलेला गोल जबरदस्त होता. मैदानाच्या अर्ध्या म्हणजे ४९. मीटर यार्डातून त्याने हा गोल केला. शिकने मारलेला फटकाल स्कॉटलंड संघाचा गोलरक्षक डी मार्शलने अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र तो पुढे आल्यामुळे त्याला हा गोल वाचवता आला नाही. मागे जाऊन गोल वाचवण्याच्या नादात मार्शल जाळ्यात घुसला होता. १९८० च्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये ४९. मीटर यार्डातून एक गोल करण्यात आला होता, त्यानंतर शिकने ४१ वर्षानंतर असा गोल मारण्यात यश मिळवले. युरोपियन चॅम्पिनयशीपमधील गोलच्या विक्रमाशी शिकच्या गोलने बरोबरी केली असली तरी तो युरो कपच्या इतिहासामधील सर्वात लांबून मारलेला गोल ठरला आहे. यासंदर्भातील माहिती युरो कपच्या आयोजकांनीच दिली आहे. शिकने लगावलेला गोल हा ४९. मीटरवरुन मारण्यात आला असून तो युरोमधील सर्वात लांबून मारलेला गोल ठरलाय. यापुर्वी हा विक्रम जर्मनीचा मिडफिल्डर असणाऱ्या टारस्टेन स्टींगच्या नावे होता. त्याने २००४ च्या युरो कपमध्ये ३८. मीटरवरुन गोल केला होता.