विद्या बालनच्या ‘शेरनी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. लवकरच विद्याचाशेरनीहा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी विद्याने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

मिनिटे ४६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये विद्या बालनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणास देखील सुरुवात करण्यात आली होती. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले होते. हा चित्रपट आता १८ जून रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विद्यासोबत अभिनेता शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार दिसणार आहेत.

शेरनीया चित्रपटाची निर्मिती टी सिरीजचे भूषण कुमार यांनी केली आहे. या विषयी बोलताना ते म्हणाले की, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांकरिता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी आनंदी आहे.”