भारताची इंग्लंडवर १-० ने आघाडी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारताची इंग्लंडवर १-० ने आघाडी

- इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव

- लोकेश राहुल ठरला सामनावीर

लंडनमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने यजमान इंग्लंड विरुद्ध १-० ने आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका चुरशीची झाली. भारताने दिलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२० धावांवर ऑल आऊट झाला, यामुळे भारताने इंग्लंडवर १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर जाहीर करण्यात आले.

मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे अष्टपैलू योगदान तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद सिराजने चार, जसप्रीत बुमराहने तीन, इशांत शर्माने दोन आणि मोहम्मद शमीने एक बळी घेतला.भारताने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिबली हे दोन्ही आघाडीचे फलंदाज शून्यवर बाद झाले. यानंतर जो रूटने हसीब हमीदसोबत इंग्लंडची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला, पण इशांत शर्माने पहिले हमीद आणि मग जॉनी बेयरस्टोला तंबूत पाठवले.

मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या धमाकेदार फलंदाजीमुळे भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. मोहम्मद शमी ५६ आणि जसप्रीत बुमराह ३४ धावांवर नाबाद राहिले. दिवसाची सुरुवात भारताने १८१/६ अशी केली होती. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने ऋषभ पंतच्या रुपात पहिला आणि त्यानंतर इशांत शर्माही माघारी परतला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये नाबाद ८९ धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या सत्रात भारताचे सुरुवातीचे तीन गडी लवकर बाद झाले, पण अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून भारताची बाजू सांभाळली. अजिंक्य रहाणे ६१, तर चेतेश्वर पुजारा ४५ धावा करत बाद झाले. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताचा ३६४ धावांवर सर्व गडी बाद झाले. जो रूटच्या शतकामुळे इंग्लंडला ३९१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे इंग्लंडला २७ धावांची आघाडी मिळाली.

लॉर्ड्सवर कसोटी सामन्यामधील तिसरा विजय