योगी विरुद्ध मोदी हे चित्र कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपने ही ठरवून केलेली रणनीती - नवाब मलिक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

योगी विरुद्ध मोदी हे चित्र कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपने ही ठरवून केलेली रणनीती - नवाब मलिक

मुंबई,: काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये येत आहेत. परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याची पोलखोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. कोरोना काळात उत्तर प्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचे मलिक म्हणाले. चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकपण योजना राबवण्यात आली नाही. कोरोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.