प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता मायकेल के. विल्यम्सचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता मायकेल के. विल्यम्सचे निधन

वायरफेम अभिनेता मायकेल के. विल्यम्सचे निधन झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन पेंटहाऊस अपार्टमेंटमध्ये मायकेलचा मृतदेह सापडल्याची माहिती न्यूयॉर्क शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे. मायकेलचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू केला आहे.

वायरया टीव्ही शोसाठी मायकल प्रसिद्ध होता. या शोमध्ये मायकलने एका ड्रग डीलर ओमर लिटल नावाच्या दुष्ट डाकूची भूमिका साकारली होती. 2002 पासून 2008 पर्यंत वायरचे पाच सीझन आले होते आणि त्या सर्वांमध्ये मायकेल त्याच्या सशक्त भूमिकेत झळकला होता. याशिवाय विल्यम्सने दोन दशकांहून अधिक काळ अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.