ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण सामान्य, हवामान विभागाचा अंदाज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण सामान्य, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : देशातील काही राज्यांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आणि दरड कोसळल्याने प्रचंड नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. जुलै महिन्यातच पावसाची ही अवस्था असल्यानंतर पुढील दोन महिने पाऊस कसा असेल? अशी चिंता अनेकांना लागली होती. याबाबत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या 'सामान्य' पावसाच्या अंदाजामुळे दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या मासिक दीर्घकालीन अंदाजामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशांत बहुतांश ठिकाणी पाऊस सामान्य राहणार असून, सरासरीच्या 94 ते 106 टक्के असेल, अशी शक्यता वर्तविली आहे. विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी हा अंदाज जाहीर केला आहे.
या अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये, भारतात पाऊस हा सरासरी 428.3 मिमी असतो. यंदा या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा किंचित कमी प्रमाणात पाऊस पडेल. जुलै महिन्यात मान्सूनची हालचाल सामान्यापेक्षा कमी राहील. तसेच महाराष्ट्र, जम्मू -काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन, आणि गंभीर पूर निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहणरा असल्याने या राज्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.