इराणी मुलीने संतूरवर वाजवली जन-गण-मन धून, देशवासीय झाले मोहित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इराणी मुलीने संतूरवर वाजवली जन-गण-मन धून, देशवासीय झाले मोहित

तेहरान,: भारताचा स्वातंत्र्यदिन देशातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी साजरा केला गेला. दरम्यान तारा गहरेमानी नावाच्या इराणी मुलीने संतूरवर राष्ट्रगीताची धून वाजवली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तेहरानमधील भारतीय दुतावासाच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या वतीने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि तिच्या या धुनीने देशवासीय मोहित झाले आहेत.
ताराला तिची आई वयाच्या पाचव्या वर्षापासून संतूर वादनाचे धडे देत होती. तेव्हापासून संतूर वादन हा तिचा छंद झाला आणि पुढे त्यामध्ये करियर करण्याची तिच्यात इच्छा निर्माण झाली. सुरुवातीला ती इराणी पारंपरिक वाद्य तोनबक वाजवत होती. त्यानंतर ती संतूरकडे वळली. तिचा २०२० मध्ये ग्लोबल चाइल्ड प्रोडिजीज अवार्डने सन्मान देखील करण्यात आला आहे.
एवढ्या लहान वयात इतक्या सुंदर पद्धतीने तिने सादर केलेले हे राष्ट्रगीत पाहून तिचे कौतुक करत आहेत. नुकतीच तिची जगातील टॉप - १५ म्युझिक प्रोडिजीज अर्थात संगीत जगातील टॉप १५ उदयोन्मुख मुलांमध्ये निवड झाली आहे.

हिंदुस्थान समाचार