मुंबईतील बलात्कार पिडीतेचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईतील बलात्कार पिडीतेचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील साकिनाका येथील बलात्कार पिडीतेचा आज, शनिवारी मृत्यू झाला. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या महिलेची प्रकृती खूप खालावली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
मुंबईच्या अंधेरी उपनगरातील साकीनाका परिसरात गुरुवारी 9 सप्टेंबरच्या रात्री टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आला. अत्यंत अमानुष पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आला. मोहन चौहान असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर रॉडसारख्या वस्तूने महिलेला जखमी केले होते. आरोपीने पिडीतेवर अनैसर्गिक अत्याचारही केले होते. नराधमाने सर्व सीमा पार करत पीडित महिलेच्या गुप्तांगात रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती. आरोपीच्या या कृत्त्यामुळे पीडित महिलेची अवस्था खूपच चिंताजनक होती. अखेर शनिवारी तिची मृत्यूशी झुंज संपली.


- लाजीरवाणी बाब- चित्र वाघ
यासंदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केलाय. आपल्या ट्विटर संदेशात वाघ म्हणाल्या की, “साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण, या मुर्दाड सरकार व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही, त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून एक आकडा ठरलीस याची लाज वाटते. सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. नाही वाचवू शकलो तुला.” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.