सर्व रुग्णालयांचे अग्निशमन सुरक्षेचे परीक्षण करा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई : राज्यातील रुग्णालयांतील विद्युत अग्निशमन सुरक्षेचे तातडीने परीक्षण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील करोनासह म्युकर मायकोसिसच्या आजारासंबंधीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री म्हणाले कीशहरी भागातील करोना संसर्ग कमी होत असताना ग्रामीण भागातील संसर्ग वाढत आहे. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  बाधितांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. करोना चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत चाचण्या कराव्यातखरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती औजारांची दुकाने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरु ठेवण्याचे नियोजन करावे.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा करोना के ंद्रे उभारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांचे पथक तयार ठेवण्यास त्यांनी सांगितलेराज्यात सुरू असणाऱ्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पांच्या  उभारणीला गती द्यावी. तसेच प्रत्येक रुग्णालयात प्राणवायू वापराचे योग्य नियोजन करण्यात यावे.