आसाराम बापूंना कोरोनाची लागण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आसाराम बापूंना कोरोनाची लागण

जयपूर : राजस्थान येथील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्याला उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

 आसाराम बापूंची ३ मे रोजी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. ५ मे रोजी त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.