पत्नीला त्रासदायक म्हणणाऱ्या नेटकऱ्याला, शोएबने दिले सडेतोड उत्तर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पत्नीला त्रासदायक म्हणणाऱ्या नेटकऱ्याला, शोएबने दिले सडेतोड उत्तर

ससुराल सिमर काफेम शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कडची जोडी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शोएब सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे लाखो चाहते आहेत. एका नेटकऱ्याने दीपिकाला त्रासदायक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, शोएबने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

शोएबने इन्स्टाग्रामवरील ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी काही नेटकऱ्यांनी शोएबला त्याच्या प्रोफेशन्ल आणि वैयक्तिक आयुष्या विषयी अनेक प्रश्न विचारले. एक नेटकरी म्हणाला, “दीपिका एवढी का ओरडते? तुम्हाला हे त्रासदायक वाटतं नाही का?” त्याला उत्तर देत शोएब म्हणाला, “तुम्हाला हे त्रासदायक वाटेल पण मला, माझं कुटुंब आणि दीपिकाला ओळखत असलेल्या लोकांना हे त्रासदायक वाटत नाही,” असे शोएब म्हणाला. शोएबने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

शोएब पुढे म्हणतो, “हरकत नाही, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि जे तिचे चाहते आहेत. दीपिका त्यांच्यासाठी अनमोल आहे. इतर लोक काय विचार करतात याने काही फरक पडत नाही,” असे बोलत शोएबने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

दरम्यान, ‘AskMeAnything’ या सेशन दरम्यान, चाहत्यांनी शोएबला त्याच्या वर्कआऊट आणि डायट प्लॅन विषयी अनेक प्रश्न विचारले. शोएब आणि दीपिका हे दोघे ही यशस्वी यूट्यूबर आहेत. सध्या दीपिका ही ससुराल सिमर का या मालिकेच्या चित्रकरणात व्यस्त आहे.