तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या फॅक्टरीला आग

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या फॅक्टरीला आग

मुंबई: पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या एका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. फ्लॉट नंबर L -9/4 रंग रसायन या फॅक्टरीमध्ये मध्यरात्री अडीच वाजता ही आग लागली. सणानिमित्ताने कंपनी बंद आहे. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी घटनास्थळी बोईसर पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.