“एकदा तरी स्वतः…” सिद्धार्थ चांदेकरची ‘ही’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला स्वतः साठीसुद्धा वेळ नाही. आपण स्वत:चा विचार करत नाही. दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या अचानक निधनानंतर बरेच कलाकार मानसिक आरोग्य, स्वत:कडे लक्षं द्या, असा सल्ला देताना दिसले. काही दिवसांपूर्वीकसौटी जिंदगी कीमधील अभिनेता साहिल आनंद ही मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसला. या नंतर आता मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पण मानसिक आरोग्य आणि स्वतः कडे लक्ष देण्यास सांगताना दिसत आहे.

सिद्धार्थ चांदेकर तसा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. मात्र सिद्धार्थने  शेअर केलेल्या या पोस्टने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्ट मध्ये सिद्धार्थ एक महत्वाचा मेसेज देताना दिसत आहेही पोस्ट शेअर करत तो नेटकऱ्यांंना  सांगायचा प्रयत्न करत आहे की, एकदा तरी स्वतःला काय हव आहे ते बघा, तुमच्या मनातून आवाज येईल त्याला ऐकायचा प्रयत्न करा. अशा आशयाची मोठी पोस्ट सिद्धार्थने शेअर केली आहे. या पोस्ट खालीएकदा तरी विचार कराअस कॅप्शन देखील दिले आहे

सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्ट खाली बऱ्याच नेटकऱ्यांंनी कमेंट केली आहे. एक युजर म्हणालाखरंच दुसऱ्यांचा विचार करता करता स्वतःला काय हवं आहे हे विसरूनच जातो आपणअजून एक युजरने कमेंट केली कीसुंदर अप्रतिम लेख सिद्धार्थ चांदेकर, हे मनोगत सांगितल्या बद्दल थॅंकयू.” सिद्धार्थने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंण्ड होताना दिसत आहे. तसेच या पोस्ट वर लाइक्स देखील मिळताना दिसले.