प.महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांना चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प.महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांना चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून २ ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी आयएमडीच्या मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 1 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा अॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांंचाही समावेश आहे. तसेच येत्या चार दिवसांत नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार पुढील काही दिवसात पाऊस जोर पकडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याआधी 30 जुलै रोजी राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 31 जुलै रोजी चार जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याचा समावेश आहे.