काबूलमधील ड्रोन हल्ल्यात निष्पापांचा बळी, अमेरिकेने मागितली माफी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काबूलमधील ड्रोन हल्ल्यात निष्पापांचा बळी, अमेरिकेने मागितली माफी

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.) काबुलमधील ड्रोन हल्ल्यात निष्पापांचा बळी गेला असल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेकडून देण्यात आले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी यासंदर्भात माफी मागितली आहे.

ते म्हणाले की, ड्रोन हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्हाला क्षमा करा, आम्ही दिलगीर आहोत. आम्ही या चुकीतून शिकण्याचा प्रयत्न करू. दरम्यान तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर काबूल विमानतळावर स्फोटांचे सत्र सुरू होते. विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांत ९५ जण ठार झाले होते तर १४० जण जखमी झाले. यात १३ अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता. तालिबान्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सात मुलांसह १० निष्पाप नागरिक मारले गेले.