अफगाणिस्तानमध्ये महिलांना शिक्षणाची मुभा मात्र ड्रेसकोड अनिवार्य

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अफगाणिस्तानमध्ये महिलांना शिक्षणाची मुभा मात्र ड्रेसकोड अनिवार्य

काबुल : अफगाणिस्तानमधील नवीन तालिबान सरकारकडून रोज नवनवीन नियमांची घोषणा केली जात आहे. आता महिलांना नियमांच्या अधीन राहून पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांसह विद्यापीठांमध्ये शिक्षण घेता येईल. मुला-मुलींना एकत्र बसता येणार नसून इस्लामिक ड्रेस परिधान करणे अनिवार्य असेल, असे उच्च शिक्षणमंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी रविवारी जाहीर केले.
एकूणच तालिबानशासित अफगाणिस्तानमध्ये महिलांना स्वातंत्र्य आणि मुक्त संचार नसून त्यांच्यावर दिवसेंदिवस निर्बंध लादले जात आहेत. याच्या काही दिवस आधी, अफगाणिस्तानमध्ये नवीन तालिबान सरकार स्थापन करण्यात आले. ज्यामध्ये एकही महिला सदस्याचा समावेश नाही. याशिवाय समान अधिकारांची मागणी करणाऱ्या महिला आंदोलकांवर हिंसाचार उघडकीस आला आहेहक्कानी म्हणाले की, तालिबानला २० वर्षे मागे जायचे नव्हते. आज आपण जे आहोत त्यावर आपण पुढे जायला सुरुवात करू. आम्ही मुला-मुलींना एकत्र अभ्यास करू देणार नाही. तसेच आम्ही सहशिक्षणाला परवानगी देणार नाही. महिला विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तालिबानकडून काही प्रतिबंधांचा सामना करावा लागेल, ज्यात अनिवार्य ड्रेस कोडचा समावेश आहे. महिला विद्यार्थ्यांना हिजाब घालावा लागेल. विद्यापीठांमध्ये कोणते विषय शिकवले जातील याचाही आढावा घेतला जाईल, असेही हक्कानी यांनी सांगितले. दरम्यान इस्लामचा कठोर अर्थ लावणाऱ्या तालिबानने त्यांच्या राजवटीत कला आणि संगीतावर बंदी घातली होती.