अभिनेत्री जेनिफर विंगेटला कोरोनाची लागण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेत्री जेनिफर विंगेटला कोरोनाची लागण

अभिनेत्री जेनिफर विंगेटला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जेनिफरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत असली तरी जेनिफरने स्वतःला घरात क्वारंटाइन केले असल्याचे तिने पोस्टमधून सांगितले आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणतीही भीती बाळगता यातून बाहेर पडणार असल्याचे तिने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
जेनिफर विंगेट येत्या २० जुलैपासूनकोड एमया वेब सीरिजच्या दुसऱ्या सीजनचे शूटिंग सुरू करणार होती. शूटिंग सुरू करण्यापूर्वी नियमाप्रमाणे तिने स्वतःची कोरोना चाचणी केली असून तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. सध्या जेनिफरने स्वतःला क्वारंटाइन केले आहे.