ऑलिंपिकचा थरार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑलिंपिकचा थरार

टोकियो येथे अखेर सार्या जगाचे लक्ष लागलेली ऑलिंपिक स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. पंधराव्या शतकात ग्रीसमध्ये सुरू झालेली ही स्पर्धा ही खेळाडूंसाठी सर्वोच्च व्यासपीठ आहे. येथे पदक मिळवल्यावर खेळाडूला आपल्या कारकिर्दीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. ग्रीसमध्ये सुरू झालेली ही स्पर्धा जगाची लाडकी झाली. इतकेच नव्हे तर जगभरात ती भरवण्यासाठी स्पर्धा लागत असते. अत्यंत अवाढव्य प्रमाणावर खेळवली जाणारी ही स्पर्धा अत्यंत कसोशीने नियोजनपूर्वक आयोजित केली जाते.  कोरोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा होत असल्याने मुळात ती होणार की नाहि, याचीच शाश्वती नव्हती. परंतु कोरोनाची दुसरी लाट विरत आहे आणि तिसरी लाट येण्याची शक्यता सध्या तरी धूसर दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला, हे उत्तम झाले. अर्थात कोरोना महामारीच्या वातावरणात स्पर्धा होत असल्याने काही अटी आणि शर्ती यावेळी अमलात आहेतच. कोणत्याही खेळाडूला आपल्या क्रिडाकौशल्याचे प्रदर्शन करताना समोर दाद देणारा प्रचंड जनसमुदाय असला तरच उत्साह येतो आणि तो आपले कौशल्याचे प्रदर्शन अधिक जोमाने करतो. परंतु टोकियो ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा असेल की ज्यात प्रेक्षक नसतील आणि टाळ्यांचा कडकडाट नसेल. त्यामुळे केवळ रिकामे स्टेडियम आणि प्रशिक्षक तसेच पंचांच्या साक्षीने ही स्पर्धा होईल. प्रेक्षकांना ही स्पर्धा फक्त दूरदृष्य प्रणालीद्वारेच दिसेल. हा अन्याय जसा खेळाडुंवर आहे तसाच तो प्रेक्षकांवरही आहे. पण आयोजकांचाही त्याला नाईलाज आहे. देशोदेशीचे उत्तमोत्तम खेळाडू अथलिट्स आपल्या क्रिडाकौशल्याचे प्रदर्शन करतील. प्रेक्षक नसले तरीही त्यांची प्रतिभा तशीच असेल आणि त्यांची जिद्द्, जिगर आणि पदक मिळवण्याचा हव्यास तसाच असेल. ऑलिंपिकवर नेहमीप्रमाणे युरोपीय संघ आणि चिन, रशिया आणि अमेरिका यांचे वर्चस्व असेल. पण भारताकडून यंदा आतापर्यंतच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहेत. एक काळ असा होता की भारतीय संघ केवळ ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यासाठी जात असे. केवळ हजेरी लावून भारतीय खेळाडू परत येत असत. एखादा साधा तरंगही त्यांच्या दौर्यामुळे उमटत नसे.  वर्षानुवर्षे हीच परिस्थिती होती आणि तेव्हाच्या भारताच्या लोकसंख्येनुसार इतकी लोकसंख्या असूनही एकही पदक विजेता निघू नये, यावर वारंवार विषादाने चर्चा होत असे. पण आता परिस्थिती बर्यापैकी बदलली आह. २००४ मध्ये राज्यवर्धन राठोडने नेमबाजीत रौप्यपदक जिंकले आणि थोडे चैतन्य आले. तर २००८ मध्ये अभिनव बिंद्राने थेट सुवर्णपदकालाच हात घातला आणि संपूर्ण भारत आनंदातिशयाने वेडापिसा झाला. त्यानंतर मग ऑलिंपिकसाठी गंभीर प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे आता भारतीय पथकाकडून पाच ते दहा पदकांची अपेक्षा केली जात आहे.  नेमबाजीमध्ये भारताला आशा आहेत कारण मनु भाकर, सौरभ चौधरी, यशस्विनी देसवाल असा चांगला संघ तेथे गेला आहे. केवळ राही सरनौबत हीच डार्क हॉर्स आहे. अर्जुन लाल आणि अरविंद सिंग ही रोईंगमध्ये चांगली जोडी आहे. दोघानीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. भारतीय हॉकी महिला संघाकडून मात्र कुणाला अपेक्षा नाहित. कारण हा संघ बाराव्या स्थानावर आहे. एकेकाळी हॉकीत भारताचा दबदबा होता. पण आता तो कधीच विरून गेला आहे. हॉकीचा खेळखंडोबा प्रशिक्षकांनी केला आहे. महिला हॉकी संघ आज कामगिरी उंचावण्याची फारशी शक्यता नसली तरीही असे असते की ज्या संघाकडून अपेक्षा नसतात त्यांच्यावर दबावही नसतो. याच कारणामुळे काही डार्क हॉर्सही असामान्य कामगिरी करून जातात. २०२४ मध्ये भारतात विश्वचषक होत आहे. त्यावेळी या महिला संघाला ऑलिंपिकचा अनुभव चांगलाच कामाला येईल. कारण या महिला तरूण आहेत  आणि त्यामुळे कित्येक वर्षे हॉकीची सेवा करू शकतात. कधी नव्हे ते भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ म्हणजे १२४ खेळाडू टोकियोला गेले आहेत. त्यात  ५२ महिला आहेत आणि महिला प्रतिनिधित्वाच्या दृष्टिने चांगली गोष्ट आहे. पुरूष खेळाडूंनी भारताला ऑलिंपिकमध्ये फारशी पदके दाखवलेली नाहित, ही वस्तुस्थिती आहे. उलट २०१२ च्या ऑलिंपिकमध्ये भारताला पीव्ही सिंधु आणि साक्षी मलिक यांनीच पदके मिळवली होती. तर कर्नाम मल्लेश्वरी, मेरी कोम यांनी भारताची मान उंचावली आहे. पुरूष पदकविजेत्यांच्या तुलनेत महिला पदकविजेत्यांची संख्या जास्त आहे,  ही भारतासाठी चांगली आणि आशादायक गोष्ट आहे. भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा यासाठी आहे  की, अनेक खेळाडू अगदी जवळ जाऊन चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर राहिले आहेत. ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी चांगली झाली नाहि तरी त्यांना आलेला अनुभव उपयोगी सिद्ध होईल, असे वारंवार म्हटले गेले.  पण पदक मिळवलेच पाहिजे, अशी जिद्द आता नवीन पिढीत दिसते आहे. हेच भारताचे आशास्थान आहे.  भारताने  निदान पाच सहा तरी पदके आणावीत, असे प्रत्येक भारतीयाला वाटणे साहजिकच आहे. तसे होईल, अशी आपण प्रार्थना करू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ऑलिंपिक स्पर्धा भारतासाठी काही तरी आशेचे चिन्ह घेऊन यावी.