मंत्रालयात दारूच्या बाटल्या! ; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर जोरदार टीका, म्हणाले…

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मंत्रालयात दारूच्या बाटल्या! ; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर जोरदार टीका, म्हणाले…

राज्यात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याचे वृत्त समोर आल्याने, सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, “महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे, असं म्हणत दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी.अशी मागणी केली आहे.

मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. राज्यामध्ये कोविड परिस्थिति बरोबर पूरग्रस्त परिस्थिति उभी आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणं आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात?” असा सवाल दरेकरांना केला आहे.

सेच, “दारूच्या बाटल्या मंत्रालायामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे. या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे. हे सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे. धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विक्रेतयांसाठी करतंय, डान्स बार वाल्यांसाठी किंवा रेस्टोरंट वाल्यांसाठी काम करत आहे, की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय हे एकदा जनतेला कळलं पाहिजे.”असंही प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवलं आहे.