मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवणाऱ्याला पुण्यातून अटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवणाऱ्याला पुण्यातून अटक

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा मेल करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शैलेश शिंदे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले. मंत्रालयातून माहिती मिळताच पुणे पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्या विरोधात मुंबईत मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी येथील हाचिंग्स शाळेने त्यांच्या मुलाचे एका वर्षाचे नुकसान केले. याप्रकरणी वारंवार तक्रार करूनही शिक्षण विभागाने लक्ष दिल्याने शैलेश यांनी तो ईमेल पाठविला असल्याचे सांगण्यात येत आहे.