9 महिन्यांत जीएसटी संकलन प्रथमच एक लाख कोटींपेक्षा कमी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

9 महिन्यांत जीएसटी संकलन प्रथमच एक लाख कोटींपेक्षा कमी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम देशाच्या वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) संकलनातही दिसला आहे. जून महिन्यात जीएसटी संकलन ९ महिन्यांत प्रथमच १ लाख कोटीपेक्षा खाली आले आहे. वित्त मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात ९२,८४९ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. याआधी सप्टेंबर २०२० मध्ये जीएसटी संकलन १ लाख कोटीपेक्षा कमी ९५,४८० कोटी होते. मात्र, जून २०२० च्या तुलनेत या वर्षी जीएसटी संकलन २ टक्के जास्त राहिले. जूनचे जीएसटी संकलन मे महिन्यात झालेल्या व्यावसायिक व्यवहाराशी संबंधित आहे.

मेमध्ये देशाच्या बहुतांश राज्यांत स्थानिक पातळीवर लॉकडाऊन होते आणि आर्थिक हालचाली मर्यादित होत्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर या वर्षी पहिल्या तिमाहीत आर्थिक हालचाली वेगवान होत्या व मार्चमध्ये चांगल्या व्यवसायामुळे सर्वाधिक जीएसटी संकलन एप्रिल २०२१ मध्ये १.४१ लाख कोटी झाले. एप्रिलच्या दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक हालचाली कमकुवत झाल्या.