यूपीएल लिमिटेडने शाश्वत विकास कामगिरी व्यवस्थापनात पटकावला आशियाई शाश्वत विकास नेतृत्व पुरस्कार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

यूपीएल लिमिटेडने शाश्वत विकास कामगिरी व्यवस्थापनात पटकावला आशियाई शाश्वत विकास नेतृत्व पुरस्कार

मुंबई : शाश्वत कृषी उत्पादने आणि सुविधा यामध्ये जागतिक पुरवठादार असलेल्या यूपीएल लिमिटेडने शाश्वत विकासाप्रती असलेल्या आपल्या अजोड बांधिलकीचे दर्शन घडवत शाश्वत विकास कामगिरी व्यवस्थापनात प्रतिष्ठेचा आशियाई शाश्वत विकास नेतृत्व पुरस्कार पटकावला आहे. आशियाई शाश्वत विकास नेतृत्व पुरस्कार हे शियामधल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या उद्योगसमुह आणि संस्था यांना सर्वोत्कृष्टता, सर्वोत्तम कामगिरी आणि नाविन्यपूर्ण धोरणे यांच्याप्रती सातत्यपूर्ण बांधिलकी जपल्याबद्दल देण्यात येतात.  डीजेएसआय आणि सस्टेनॅलिटीक्स सारख्या प्रथितयश संस्थांकडून यूपीएलला शाश्वत विकासाच्या क्षेत्रातली अग्रणी म्हणून मान्यता मिळाली आहे. अन्न मूल्य साखळीकडे बघण्याचा त्यांचा एकमेवाद्वितीय दृष्टीकोन त्यांना शाश्वत विकासाच्या केंद्रस्थानी ठेवतो. असंख्य प्रकारचे पुढाकार घेऊन केलेले कार्यक्रम आणि उपक्रम यांच्या माध्यमातून यूपीएलने शाश्वत विकासाप्रती असलेली त्यांची बांधिलकी दर्शवली आहे. (२०१५-१६ चे वर्ष मूलभूत पातळी म्हणून धरले तर) २०१७ पासून २०२० पर्यंतच्या आर्थिक वर्षात कार्बन उत्सर्जनात २६ % ने घट, कचरा निस्सारण क्षमता ४५% आणि पाण्याचा वापर करण्याचे प्रमाण २१% ने कमी करून पर्यावरण रक्षणात मोठा ठसा उमटविला आहे. जगभरात यूपीएल लिमिटेडचे काम १३८ देशांमध्ये चालते आणि त्यांचे ६०% प्लांटस हे शून्य द्रव उत्सर्जन प्लांट्स आहेत. 

 

 या जोडीला, कंपनी युएन ग्लोबल कॉम्पॅक्ट तसेच वर्ल्ड बिझनेस कौन्सिल फोर सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांची सदस्य आहे. या दोन्ही संस्था शाश्वत विकासासाठी कायर्रत आहेत. डाऊ जोन्सच्या सस्टेनेबिलिटी इयरबुक २०२० मध्ये समाविष्ट होणारी यूपीएल ही जगातील एकमेव पीक सुरक्षा कंपनी असून शाश्वतता गुणांकन देणाऱ्या ‘सस्टेनॅलिटीक्स’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपनीतर्फे ‘यूपीएल’ला प्रथम क्रमांकाची अॅग्रोकेमिकल कंपनी म्हणून नावाजण्यात आलेले आहे. तीन वर्षांत २५ टक्क्यांहून अधिक वृद्धी साध्य करणाऱ्या ‘यूपीएल’ला ‘एफटीएसई रसेल’तर्फेही गुणांकन देण्यात आले असून ‘एफटीएसई फॉर गुड अँड रिस्पॉन्सिबल केअर’ची ती प्रमाणित लोगोधारक कंपनी आहे.  या यशाबद्दल बोलताना, यूपीएल लिमिटेडचे जागतिक उपाध्यक्ष – पर्यावरण आणि शाश्वतकार्य डॉ. मृत्युंजय चौबे, म्हणाले, “यूपीएल मध्ये आम्ही कृषी क्षेत्रात शाश्वत सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्याने काम करत आहोत. अगदी स्थापनेपासूनच आमच्या मूलभूत कार्यप्रणाली तत्वांचा हा एक अतूट भाग असून आमच्या संपूर्ण मूल्यसाखळीमध्ये अंतर्भाव असलेल्या प्रत्येक व्यवसायात त्याची अंमलबजावणी करण्यात येत असते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंदित आणि कृतज्ञ वाटत आहे आणि शाश्वत बदल घडवून आणण्यासाठीची आमची ध्येय मोहीम अशीच पुढे सुरु ठेवू आणि एकूणएक खाद्य उत्पादनाला शाश्वत बनवू शकू, अशी आम्हाला आशा आहे.