आधारला पॅन किंवा EPF खात्याशी जोडण्यात येणार नाही अडचण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आधारला पॅन किंवा EPF खात्याशी जोडण्यात येणार नाही अडचण

यूआयडीएआयने आधारला पॅन किंवा ईपीएफओशी लिंक करण्याच्या सुविधेतील अडथळ्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. UIDAI ने म्हटले आहे की, त्याच्या सर्व सेवा स्थिर असून योग्यरित्या कार्यरत आहेत. ईपीएफओने आधारला ईपीएफ खात्याशी लिंक करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. गेल्या 9 दिवसात 51 लाखांहून अधिक नामांकन दाखल

यूआयडीएआयच्या मते, आधार-पॅन/ईपीएफओ लिंकिंग सुविधेत कोणताही प्रकारची अडचण येत नाहीये. ही एक प्रमाणीकरण-आधारित सुविधा आहे. गेल्या आठवड्यात सिस्टमला तातडीने सुरक्षा अपग्रेड केले जात होते. त्यामुळे नावनोंदणी आणि मोबाईल अपडेट सेवा सुविधामध्ये अडचण येत होती. परंतु, अपग्रेडेशनंतर ही प्रक्रिया पूर्ववत झाली. विशेष म्हणजे 20 ऑगस्ट 2021 पासून अपग्रेडेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या 9 दिवसांत 51 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली असल्याचे यूआयडीएआयने सांगितले.

31 ऑगस्टपर्यंत ईपीएफला आधारशी जोडणे आवश्यक

31 ऑगस्टपर्यंत ईपीएफ खात्याला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केले तर अनेक समास्यांना सामोरे जावे लागू शकते. ईपीएफओने सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत, सर्व EPF खातेधारकांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) देखील आधार व्हेरिफाईड करणे आवश्यक आहे.