कंगना रणौतने बुडापेस्टमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कंगना रणौतने बुडापेस्टमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयापेक्षा जास्त बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असते. पण सध्या तिचं चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. कंगनाचे काही सुंदर फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कंगना बुडापेस्टमधल्या रस्त्यांवर वेगवेगळे पोज देताना दिसून आली.

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामीधाकडचित्रपटाच्या शूटिंगसाठी बुडापेस्टमध्ये पोहोचली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. कंगनाच्या पासपोर्ट प्रकरणामुळे बुडापेस्टमध्ये या चित्रपटाची शूटिंग उशिराने सुरू झाली. येत्या ऑगस्टपर्यंतधाकडच्या शूटिंगचं काम सुरू राहिल असं सांगण्यात येतंय.

धाकडचित्रपटाच्या शूटिंगमधून मिळालेल्या मोकळ्या वेळेत कंगना बुडापेस्टमध्ये एन्जॉय करताना दिसून आली. याचे काही फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यात तिने प्लोरल ड्रेस परिधान केलेला आहे. बुडापेस्टच्या रस्त्यावर जणू ती एखाद्याप्लोरल क्वीनसारखी दिसत आहे. बुडापेस्टमधल्या नैसर्गिक वातावरणाला साजेसा अशाफ्लोरल ड्रेसमध्ये ती आणखीनच खुलून दिसत आहे. कंगनाची हीफ्लोरल ब्यूटीपाहून तिचे फॅन्स सुद्धा घायाळ झाले आहेत.

हे फोटोज शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “आज बॉली बिम्बो खेळायचं ठरवलंआणि माझ्या बुद्धिमान इन्स्टा परिवारसाठी स्पेशल इन्स्टा स्टाईलचं फोटोशूट केलं आहे…”