सप्टेंबरपर्यंत ब्लॅक फंगसच्या औषधी टॅक्स फ्री!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सप्टेंबरपर्यंत ब्लॅक फंगसच्या औषधी टॅक्स फ्री!

केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कर परिषदेने कोरोनावर उपचार घेणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापुढे ब्लॅक फंगसवरील औषधींवर कुठल्याही प्रकारचा कर लागणार नाही. जीएसटी कौन्सिलच्या 44 व्या बैठकीनंतर शनिवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, की कोरोनावर उपचार घेताना लागणाऱ्या औषधींवर आणि उपकरणांवर लागणारा कर कमी करण्यात आला आहे. जीएसटी दरांमध्ये करण्यात आलेली ही कपात केवळ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. यानंतर पुन्हा जुने दर लागू केले जातील.

रुग्णवाहिकेवर लागणार 12% जीएसटी
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत रुग्णवाहिकांच्या जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आता रुग्णवाहिकांवर 12% टक्के जीएसटी लावले जाईल. यापूर्वी रुग्णवाहिकांकडून 28% जीएसटी वसूल केला जायचा. यासोबतच ब्लॅक फंगसवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या टोसिलिझुमाब आणि एम्फोथ्रेसिन-बी या औषधींवर कुठल्याही प्रकारचा कर लावला जाणार नाही. यापूर्वी या औषधींवर 5% जीएसटी घेतला जात होता.

कोरोना काळातील उपाचारावर असे घटवले जीएसटीचे दर

  • ऑक्सीमीटरवर 12% जीएसटी घेता 5% घेतली जाईल.
  • हँड सॅनिटायजरवर 18% कर होता आता 5% करण्यात आले.
  • व्हेंटिलेटरवर लावले जाणारे 12% कर आता 5% करण्यात आले.
  • रेमडेसिवीरवर आता 12% नाही तर 5% कर घेतले जाईल.
  • मेडिकल ग्रेड ऑक्सीजनवर 12% कर लावले जायचे, ते आता 5% झाले.
  • BiPaP मशीनीवर लावले जाणारे 12% कर घटवून 5% केले.
  • पल्स ऑक्सीमीटरवर 12% कर लादले जात होते ते आता 5% करण्यात आले.
  • ऑक्सीजन काँसंट्रेटरवर आता 12% नाही तर 5% कर लागणार आहे.
  • इलेक्ट्रिक फर्नेसेजवरील कर घटवून 5% करण्यात आले. यापूर्वी 12% होते.
  • तापमान मापक यंत्रावर लागणारे 12% कर घटवून 5% झाले.
  • हाय-फ्लो नेजल कॅनुला डिव्हाइसचे कर 12% वरून 5% करण्यात आले.
  • हेपारीन औषधींवरील कर 12% लावता 5% लावले जाणार आहे.
  • कोविड टेस्टिंग किटवर यापूर्वी 12% कर होते आता 5% करण्यात आले.

जीएसटी परिषदेने 28 मे रोजी झालेल्या बैठकीनंतर कोरोना आणि ब्लॅक फंगसवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषध, उपकरणांवरील कर घटवण्याचा प्रस्ताव ठेवला. यासाठी 8 मंत्र्यांच्या मंत्रिमगटाची स्थापना करण्यात आली होती. त्याच शिफारसी आता मान्य करण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यादीत दिलेल्या गोष्टींव्यतिरिक्त कुठेही जीएसटी कपात करण्यात आलेली नाही. RT-PCR मशीन, RNA मशीन आणि जीनोम सीक्वेंसिंग मशीनवर लावले जाणारे 18% कर जैसे थे राहील. जीनोम सीक्वेंसिंग किट्सवर लागणाऱ्या 12% करात सुद्धा कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. वर दिलेल्या सवलतींवर सप्टेंबरनंतर फेरविचार केला जाऊ शकतो.