वैद्यकीय परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे नियमानुसार संयुक्तिक ठरत नाही - अमित देशमुख

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वैद्यकीय परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे नियमानुसार संयुक्तिक ठरत नाही - अमित देशमुख

 मुंबईसध्या कोवीड१९ प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्णता काळजी घेतली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे  या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्री. देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यात कोवीड१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जून पर्यंत लॉकडाऊन लागू आहे, त्यामुळे जून पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जून पासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोवीड१९ प्रादुर्भावात वाढ झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयानी केले आहे, असे असतांना या परीक्षा रदद कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विदयार्थी करीत आहेत. वास्तवीक पाहता वैदयकीय महाविदयालयाकडून शिक्षण घेणारे विदयार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्याच्या परीक्षा रदद करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही. केद्रिंय नियामक मंडळालाही ते मानय नाही शिवाय उच्चन्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. एकंदरीत या पार्श्वभुमीवर सर्व विदर्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विदयार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावे असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे