व्हीडा क्लिनिकल रिसर्चला सेब पार्टनर्स आणि मार्की एचएनआयकडून मिळाले वृद्धी भांडवल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

व्हीडा क्लिनिकल रिसर्चला सेब पार्टनर्स आणि मार्की एचएनआयकडून मिळाले वृद्धी भांडवल

मुंबई : व्हीडा क्लिनिकल रिसर्च (व्हीडा) या भारतातील फुल-सर्व्हिस क्लिनिकल रिसर्च ऑरगनायझेशने (सीआरओ) सेब पार्टनर्स या प्रायव्हेट इक्विटी फंडने नेतृत्व केलेल्या राउंडमद्ये १६ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा निधी उभारला. या राउंडमध्ये प्रणब मोदी (जेबी केमिकल्सचे), हॅवल्स इंडिया फॅमिली ऑफिस, निखिल व्होरा (सिक्स्थ सेन्स व्हेंचरचे संस्थापक; पेटीएम, फॉग डिओडरंट यासारख्या कंप्यांमधील पहिले गुंतवणूकदार), अर्जुन भाटिया (ज्युबिलिअंटचे) इत्यादी एचएनआय सहभागी झाले होते

 

 सेब पार्टनर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव मालिवाल म्हणाले : “इक्विटी गुंतवणूकदार म्हणून व्हीडाशी भागीदारी करताना आम्ही अत्यंत उत्साहात आहोत. आर्थिक नियमन यांची सांगड घातली गेल्यामुळे सीआरओ क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील महसूलाचा विचार करता एक सर्वात मोठी स्वतंत्र फुल सर्व्हिस क्लिनिकल रिसर्च ऑरगनायझेशन म्हणून या संधीचा फायदा घेण्यासाठी व्हीडासाठी अनुकूल परिस्थिती आहे. अनुभवी वैज्ञानिक गुणवत्ता व्यवस्थापन टीम यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास अत्यंत उत्सुक आहोत.” 

 

व्हीडाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अजय टंडन म्हणाले, “आमच्या ग्लोबल इनोव्हेटर, जेनेरिक आणि बायोफार्मा क्लाएंट्सना औषध विकास, वैद्यकीयपूर्व आणि वैद्यकीय संशोधन सेवा उपलब्ध करून देणारा प्रथम पसंतीचा रिसर्च भागीदार होण्याचे आमचे व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठी सेब पार्टनर्स आणि इतर मान्यवर गुंतवणूकदारांनी आमच्याशी भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही अत्यंत आनंदी झालो आहोत. आमच्या क्लाएंट्सच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी दिवसेंदिवस अधिकाधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने आमच्या डिलिव्हरी कार्यक्षमतांमध्ये आम्ही यापुढेही गुंतवणूक करत राहू.”