सेन्सेक्स पहिल्यांदाच 56 हजारांच्या पार; 4 दिवसांमध्येच 1 हजार अंकांनी घेतली उसळी, निफ्टीनेही पार केला 16,700 चा टप्पा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सेन्सेक्स पहिल्यांदाच 56 हजारांच्या पार; 4 दिवसांमध्येच 1 हजार अंकांनी घेतली उसळी, निफ्टीनेही पार केला 16,700 चा टप्पा

शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे प्रमुख इंडेक्स विक्रमी उंच्चीवर ट्रेड करत आहे. सोबतच, लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप देखील पहिल्यांदाच 242 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. या दरम्यान, TCS आणि बजाज फायनान्स मार्केटचे भांडवलही विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.

4 दिवसात सेन्सेक्सची हजार अंकांनी उसळी

जागतिक ट्रेण्ड, मजबूत देशांतर्गत आर्थिक आकडेवारी आणि चांगल्या तिमाही निकालांवर शेअर बाजार पॉझिटिव्ह राहिले. परिणामी, BSC सेन्सेक्सने निर्देशांक केवळ 4 दिवसात 55,000 ते 56,000 ची पातळी ओलांडला आहे. 18 ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच 56,118 ची पातळी गाठली. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 16,700 च्या विक्रमी पातळी गाठली.

बाजाराचे तज्ज्ञ अविनाश गोरक्षकर यांच्या मते, भारतीय बाजाराला जागतिक म्युच्युअल फंड यांनी पाठिंबा दिला आहे, जे चीनमधून इकडे शिफ्ट करत आहेत. अशा स्थितीत, अल्पावधीत थोडीशी नफा वसुली होऊ शकते, परंतु येत्या काही दिवसांत नफा कायम राहील. तसेच, लसीकरण वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण नाही. ते म्हणाले की, मोदी सरकार असो किंवा अमेरिकेतील बायडेन सरकार, सर्वजण उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहेत. अशा परिस्थितीत सिमेंट आणि स्टीलची मागणी आणखी वाढू शकते.

BSC चे मार्केट कॅप पहिल्यांदा 242 लाख कोटी रुपयांवर पोहोचले
बाजारपेठेतील वाढीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 242 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. या दरम्यान, टाटा समूहाची आयटी कंपनी TCS ची मार्केट कॅप पहिल्यांदा 13 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली. देशांतर्गत बाजारपेठेत रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बाजारपेठ असलेली ही कंपनी आहे. RIL चे मार्केट कॅप 13.65 लाख कोटी रुपये आहे.

2021 मध्ये आतापर्यंत निफ्टी 19% पर्यंत वाढली
शेअर बाजाराला बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एचडीएफसी बँक, टीसीएस यासह अल्ट्राटेक सिमेंटचा पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी गुंतवणूकदारांना सलग दोन आठवडे पॉझिटिव्ह परतावा मिळाला आहे. शेअर बाजारात 2021 मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स 17% आणि निफ्टी 19% वाढला आहे. या दरम्यान दोन्ही निर्देशांकांनी नवीन पातळी गाठली आहे.