स्पुटनिक-व्ही लस हैदराबादमध्ये दाखल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

स्पुटनिक-व्ही लस हैदराबादमध्ये दाखल

हैदराबाद : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत मंगळवारी सकाळी रशियाहुन विशेष विमानातून  स्पुतनिक व्ही कोरोना लसीच्या मात्र हैदराबाद विमानतळावर दाखल झाल्या. एप्रिल महिन्यात भारताच्या औषध नियंत्रक महासंचालनालयाने रशियाच्या स्पुतनिक व्ही कोरोना लसीस अत्यावश्यक आणि आपतकालीन  परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिली. स्पुतनिक व्ही द्वारे लसीकरण काही भागात सुरु झालेले आहे.

देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा  नूतन- तिसरा टप्पा 1 मे पासून सुरु झालेला आहे. अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या 18-44 सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली जात आहे. याद्वारे मोठ्या आणि व्यापक स्वरूपात लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. पात्र नागरिक या लसीकरणासाठी http://Cowin.gov.in.  या संकेतस्थळावर डिजिटल नोंदणी करू शकतात.