व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 43 रुपयांची वाढ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 43 रुपयांनी वाढ केलीय. या दरवाढीनंतर आता दिल्लीत १९ किलोग्राम सिलेंडरचे दर 1736. 50 रुपये झाले आहेत. हे नवे दर आज, शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत. दरम्यान घरगुती वापराच्या गॅस दरामध्ये अद्याप कुठलीही वाढ जाहीर झालेली नाही.
सुमारे महिन्याभरापूर्वी १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 75 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामपूर्वी ऑगस्टमध्येही किंमती दुप्पटीने वाढल्या होत्या. खरं पाहायला गेलं तर, इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 2021 मध्ये आतापर्यंत एकूण 404.50 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत प्रति व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1332 रुपये इतकी होती. जी आता अवघ्या 9 महिन्यांत थोड्या थोड्या वाढ होऊन 1736.50 रुपयांवर पोहोचली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हा हॉटेल्स, ढाबे आणि सार्वजनिक भोजनालयांमध्ये अधिक होतो. त्यामुळे, आता दर वाढल्याने हॉटेलिंग महाग होऊ शकतं. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती 884.50 रुपयांवर स्थिर आहेत.