भारतात ५० वर्षांत उष्णतेच्या लाटांचे १७ हजार बळी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात ५० वर्षांत उष्णतेच्या लाटांचे १७ हजार बळी

नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटांनी भारतात गेल्या पन्नास वर्षांत  १७ हजार  बळी गेले आहेत असे देशातील  हवामानतज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.

१९७१ ते २०१९ या काळातील ७०६ उष्णता लाटांतील घटनांचा अभ्यास यात केला असून या संशोधन निबंधाचे लेखन पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम. राजीवन यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिक कमलजित राय, एस.एस  राय, पी. के. गिरी. .पी. डिमरी यांनी केले आहे.   १९७१ ते २०१९ या काळात अतितीव्र  हवामान स्थितीत भारतात लाख ४१ हजार ३०८ बळी गेले असून त्यातील १७,३६२ मृत्यू हे उष्णतेच्या लाटेने झाले आहेत. त्यातही हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या बारा टक्के आहे. २०१९ मध्ये उष्णतेच्या लाटा २६ वेळा आल्या. त्यात महाराष्ट्रात १५, केरळात , बिहार , राजस्थान या प्रमाणे बळी गेले आहेत.

उष्णतेच्या लाटेने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात, त्यातून लोकांचे बळी जातातजास्तीत जास्त उष्णतेच्या लाटा आंध्र प्रदेश, तेलंगण ओडिशात आल्या आहेत. मूलभूत उष्णता लाट विभाग, अति उष्णता लाट विभाग या वर्गवारीचा विचार करता मे महिन्यात अशा घटना जास्त प्रमाणात घडल्या आहेत. मूलभूत उष्णता लाट विभागात पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश तेलंगण यांचा समावेश आहे. या अभ्यासामुळे उत्तर गोलार्धातील अलीकडच्या उष्णता लाटांच्या होणाऱ्या परिणामांचे महत्त्वही अधोरेखित झाले असून अमेरिका ,कॅनडा या देशात उष्णतेची लाट नुकतीच आली होती. व्हँकुव्हर येथे ४९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. उत्तर भारतीय पठारे टेकडय़ांवर उष्णतेच्या लाटांचा अनुभव येतो. पठारांवर तापमान अनेक भागात चाळीस अंशांवर होते. शोधनिबंधात म्हटले आहे,की उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण टोकाच्या हवामान स्थितीतील मृत्यूंमध्ये वाढत आहे. पठारी प्रदेशात ४० अंशांवर पर्वतीय प्रदेशात ३० अंश सेल्सियसवर तापमान गेल्यास उष्णतेची लाट जाहीर केली जाते. किनारी प्रदेशात ४० अंशांवर इतर ठिकाणी ४५ अंशांवर उष्णतेची लाट जाहीर केली जाते. सर्वसाधारणपणे चाळीस अंश सेल्सियस तापमानावर उष्णतेची लाट जाहीर करण्यात येत असते. २०१७ मधील उष्णतेच्या लाटांचे  बळी आंध्र , झारखंड , महाराष्ट्र , ओदिशा , तेलंगणा १२, पश्चिम बंगाल या प्रमाणे होते. २०१८ मध्ये उष्णतेच्या लाटांच्या १२ घटना होऊन त्यात उत्तर प्रदेशात , महाराष्ट्रात , झारखंडमध्ये , केरळात , छत्तीसगडला या प्रमाणे बळी गेले. २०१९ मध्ये उष्णतेच्या लाटेच्या २६ घटना झाल्या असून महाराष्ट्रात १५, केरळात , बिहार , राजस्थान या प्रमाणे बळी गेले आहेत. उष्णतेच्या लाटेने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात, त्यातून लोकांचे बळी जातात.