गौरी खानने लेकीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गौरी खानने लेकीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टार किडस् चर्चेत आहेत. यात शाहरुख खानची लेक सुहाना कायमच वेगवेगळ्या
कारणांमुळे चर्चेत असते. आज सुहानाचा वाढदिवस असून ती २१ वर्षांची झालीय. याच निमित्ताने सोशल
मीडियावर सुहानावर शुभेच्छांचा वर्षाव होतो.
यात सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे सुहानाची आई गौरी खानच्या पोस्टने. गौरीने सोशल मीडियावर
सुहानाचा एक सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौरीने शेअर केलेल्या फोटोत
सुहाना एका खुर्चीवर बसलेली दिसतेय. तिने पोलका डॉट ड्रेस परिधान केलाय. कॅप्शनमध्ये गौरी म्हणालीय,
“तुझ्यावर आज..उद्या आणि कायमच प्रेम राहिल.” तर गौरीच्या या पोस्टवर सुहानाने देखील कमेंट केलीय. “आय
लव्ह यू” असं सुहाना कमेंटमध्ये म्हणालीय. गौरीच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कमेंट करत
सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नीलम कोठारीने कमेंट करत म्हंटलंय, “हॅपीएस्ट बर्थडे
डार्लिंग सुहाना”. तर नीलमसोबतच सीमा खान, भावना पांडे, संजय कपूर अशा अनेक सेलेब्सनी सुहानाला बर्थ डे
वीश केलंय
सुहाना खान सध्या न्यू यॉर्कमध्ये फिल्म मेकिंग आणि अभिनयाचं शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावर सुहाना
चांगलीच सक्रिय असून तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सुहानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा
व्हायरल होत असतात.