रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता 24 आणि 31 ऑक्टोबरला होणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता 24 आणि 31 ऑक्टोबरला होणार

मुंबई : आरोग्य विभागातील गट क मधील जागांसाठीसाठी 25 सप्टेंबर रोजी होणारी आणि गट ड मधील जागांसाठी 26 सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता.या निर्णयामुळे आरोग्य विभागाला अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते.आता या रद्द झालेल्या परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.त्यानुसार 24 ऑक्टोबरला गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती टोपे यांनी दिली.  

अनेक कारणांमुळे चर्चेत असणारी आरोग्य विभागाची गट क मधील जागांसाठीसाठी 25 सप्टेंबर रोजी होणारी आणि गट ड मधील जागांसाठी 26 सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी या विरोधात आवाज उठवला होता. शिवाय या निर्णयामुळे आरोग्य विभागाला राजकीय टीकेला सामोरे जावे लागले होते.या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता.या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज या परीक्षांच्या नव्या तारखांची आज घोषणा केली आहे. त्यानुसार आता 24 ऑक्टोबरला गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती टोपे यांनी दिली.या परीक्षांचे हॉल तिकीट 9 दिवस अगोदर दिले जाईल, अशी देखील माहिती टोपे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा,परीक्षा केंद्रांची माहिती आणि उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी,अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले.

मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता असे सांगून,त्यावर कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे टोपे म्हणाले. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या परीक्षा घेण्यासाठी न्यास ही संस्था आरोग्य विभागाने ठरवली नव्हती.सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागाने पाच एजन्सीची निवड केली होती. आरोग्य विभागाचे काम हे परीक्षेचा पेपर तयार करणे होते.परीक्षा पेपरचे प्रिटिंग, परीक्षा केंद्र निवडणे, इतर बाबी या संबंधित एजन्सीच्या होत्या. आरोग्य विभागाने पेपर तयार करुन त्यांच्याकडे सोपवण्याचे काम केले आहे असेही टोपे यांनी सांगितले.आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.