इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी घेतली लस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी घेतली लस

इंग्लंडविरुद्धच्या सर्व मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केल्यानंतर सर्वांना करोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या सर्व संघ मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संघातील सदस्यांना लस देण्यात आली. तर लसीचा दुसरा डोस हा इंग्लंड येथे देण्यात येणार आहे.

महिला संघातील सदस्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लसीचा दुसरा डोस हा इंग्लंडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया सिलेक्शन कमेटीने इंग्लंडमध्ये होणाऱ्या एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी २० सामन्यांसाठी भारतीय महिला संघाची निवड केली आहे. शेफाली वर्माला पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यासाठीच्या कर्णधार पदाची जबाबदारी मिताली राजकडे देण्यात आली आहे. तर टी २० साठी हरमनप्रीत कौरकडे कर्णधार पद असणार आहे.

भारतीय महिला संघ १६ जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना २७ जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना ३० जून रोजी टाँटन येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना जुलै रोजी वॉरसेस्टर येथे होईल. यानंतर ते १५ जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.