ड्रोन हल्ला प्रकरणी एनआयएकडून दोन संशयितांना अटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ड्रोन हल्ला प्रकरणी एनआयएकडून दोन संशयितांना अटक

जम्मू : जम्मूच्या एयरफोर्स स्टेशनवर रविवारी पहाटे ड्रोनच्या माध्यमातून झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं खरं लक्ष्य हे एयर ट्रॅफिक कन्ट्रोल आणि एमआय-17 हेलिकॉप्टर असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी एनआयएने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे

 जम्मूच्या टेक्निकल विमानतळ परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास दोन स्फोट झाले होते. या स्फोटांनंतर लागोलग एनआयएने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. त्यामधून असं समोर आलं की या ड्रोन हल्ल्याचे लक्ष्य हे एयर ट्रॅफिक कन्ट्रोल म्हणजे एटीसी आणि एमआय-17 हेलिकॉप्टर होते. पण हे लक्ष्य चुकले. एका ड्रोनमध्ये जवळपास 5 किलो स्फोटके होती तर दुसऱ्या ड्रोनमध्ये त्यापेक्षा थोड्या कमी वजनाची स्फोटके असल्याचे तपासातून समोर आले आहे. गेल्या वर्षी अशाच प्रकारचा ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा अधिक तपास एनआयए आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून ते टेरर आउटफिट्सचे ऑपरेटर असल्याचे सांगण्यात येतंय. या दोघांनी हल्ल्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडल्याची माहिती पुढे आलीय. या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं एयर फोर्सच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. एयर चीफ मार्शल हे सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर असून ते या तपासाची संपूर्ण माहिती घेत आहेत. काल ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी एयर सर्व्हेलंसची सर्व उपकरणे, एयर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम आणि एमआय 17 हेलिकॉफ्टर होते.

 हिंदुस्थान समाचार