“देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य”; ‘त्या’ विधानामुळे सोनम कपूर ट्रोल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य”; ‘त्या’ विधानामुळे सोनम कपूर ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर पुन्हा एकदा तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ‘लंडन मधील स्वातंत्र्य’ या सोनम कपूरच्या नुकत्याच केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला आहे.

सोनम कपूर सध्या लंडनमध्ये पती आनंद आहुजासोबत राहतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनमने ती लंडनमधील स्वातंत्र्याचा आनंद लुटत आहे असं विधान केलं होतं. यावेळी सोनमने घरातील सर्व काम ती स्वत: करत असून ही काम करण्यात तिला मजा येत असल्याचं ती म्हणाली होती. वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सोनम म्हणाली ” मला इथलं स्वातंत्र्य आवडतं. मी स्वत: स्वयंपाक करते, घराची साफ सफाई करते..बाजारातून किराणा खरेदी करते.” असं सोनम म्हणाली होती. सोनमच्या याच विधानावरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.

‘लंडनमधील स्वातंत्र्य’ या वाक्यावरून नेटकऱ्यांनी सोनमवर निशाणा साधला आहे. भारतातदेखील सोनम स्वत: काम करू शकली असती घरकामांसाठी माणसं ठेवण्याची तिच्यावर कुणी जबरदस्ती केली नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी सोनमचा समाचार घेतलाय. एक युजर म्हणाला, “ती मंद आहे हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं..तिच्या घरात मोकरीण आणि घरकाम करणाऱ्यांनी जबरदस्ती प्रवेश केला होता का?” तर दुसरा युजर म्हणाला, ” भारतात स्वातंत्र्य एन्जॉय करण्यापासून कुणी तुला अडवलं होतं? देशात घरकामं केलं तर लाजीरवाणं आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य..व्वा..भारतीय महिलांना सेकेण्ड क्लास नेटिझन्स म्हणणाऱी सोनम कपूर दुट्टपीपणाची पण हद्द असते.”