गुजरात : भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गुजरात : भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

आणंद : गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील तारापूर परिसारत ट्राक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झालाय. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन तारापूर येथे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले

 

या अपघातासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधून एकाच कुटुंबातील लोक प्रवास करत होते. सूरतकडून भावनगरला जाताना हा अपघात झाला. आणंद जिल्ह्यातील तारापूर भागात महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. ट्रक मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. कार आणि ट्रक भरधाव वेगात असल्यामुळे या धडकेत मोठी जिवितहानी झाली. ट्रकची धडक बसताच कारचा चेंदामेंदा होऊन त्यातील प्रवासी जागीच गतप्राण झालेत