जर्मनी व बायर्न म्युनिकचे दिग्गज फुटबॉलपटू गर्ड मुलर यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जर्मनी व बायर्न म्युनिकचे दिग्गज फुटबॉलपटू गर्ड मुलर यांचे निधन

नवी दिल्ली: जर्मनीचे दिग्गज माजी फुटबॉलपटू गर्ड मुलर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जर्मनी आणि बायर्न म्युनिकचे दिग्गज फुटबॉलपटू म्हणून गर्ड मुलर यांची ओळख होती. क्लब आणि त्यांचे सर्व चाहते मुलर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. मुलर यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.

गर्ड मुलर यांची कारकीर्द

● १९६४ मध्ये बायर्न म्युनिकमध्ये सामील झाले.

● बायर्न आणि जर्मन राष्ट्रीय संघासाठी इतिहास घडवला आहे.

● बायर्नसाठी ६०७ स्पर्धात्मक सामन्यांमध्ये ५६६ गोल केले.

● आजही बुंडेस्लिगामध्ये ३६५ गोलसह सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम

● स्पर्धेत सात वेळा सर्वाधिक गोल करणारेही मुलर हेच आहेत.

● मुलर यांनी राष्ट्रीय संघासाठी ६२ सामन्यांत ६८ गोल केले आहेत.

● इंटरकॉन्टिनेंटल कप, तीन युरोपियन कप यांच्या विजेतेपदात त्यांचा सहभाग होता.

● मुलर हे बुंडेस्लिगा चॅम्पियन आणि चार वेळा डीएफबी कप विजेता होते.

● राष्ट्रीय संघासह त्यांनी १९७२ युरोपियन चॅम्पियनशिप आणि १९७४चा विश्वचषक जिंकला. यात मुलर यांनी नेदरलँड्सविरुद्ध म्युनिकमध्ये अंतिम सामन्यात विजयी गोल केला.

● निवृत्तीनंतर युवा प्रशिक्षक म्हणून बराच काळ क्लबमध्ये राहिले.