गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर

देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ करोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ५५५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे.

देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ५८९ रुग्ण दगावले आहेत. सध्या विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९३ टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ५६ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून हा दर गेल्या २५ दिवसांपासून सलग ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

आतापर्यंत ५०.२६ कोटी करोनाचा चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, लसीकरण मोहिमेअंतर्गत ५७.२२ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.