सिंहगडाचा विकास करताना पर्यावरणाचाही विचार करा - उपमुख्यमंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सिंहगडाचा विकास करताना पर्यावरणाचाही विचार करा - उपमुख्यमंत्री

पुणे : किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयात किल्ले सिंहगड परिसर विकासाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘परिसरातील वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग करावा. वाहनतळावर वाहनचालकांसाठी देखील सुविधा असावी.पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात यावी. पर्यटकांना इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा.येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात यावे.पर्यटकांना पिठलं- भाकरीसारखे स्थानिक व्यंजन उपलब्ध द्यावेत. किल्ल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी.’यावेळी सादरणीकरणाद्वारे किल्ल्याच्या परिसरातील विकास आराखड्याची माहिती देण्यात आली.