मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या हस्ते पूर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या हस्ते पूर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन

अमरावती,  - कृष्णा नदी परिसरात पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधण्यात येणा-या 1.5 किमी लांब पूर संरक्षक भिंतीच्या निर्मितीसाठी आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात बुधवारी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी सहभागी झाले.जगन मोहन रेड्डी  यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली तसेच आगामी कार्याची दिशा यावर चर्चा केली. यावेळी राज्य सरकारच्या संबंधित विभागांचे मंत्री, आमदार आणि अन्य अधिकारी- मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.  

कृष्णा नदी तीरावर  कनकदुर्गा वराधी आणि कोटी नगर भागात निर्माण होणा-या या प्रकल्पास जवळपास 122.9 कोटींचा निधी लागणार असून 31,000 पूरग्रस्त नागरिकांना याद्वारे सुलभता होणार आहे. ट्वीटरद्वारे मुख्यमंत्री कार्यलयाने ही माहिती दिली.