ऑक्सीजन एक्सप्रेसद्वारे दररोज देशभरात 800 मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑक्सीजन एक्सप्रेसद्वारे दररोज देशभरात 800 मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा

नवी दिल्ली : सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवे उपाय शोधत, देशभरातल्या विविध राज्यांमधे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्याचा दिलासा देणारा भारतीय रेल्वेचा प्रवास सुरुच आहे. 

 आतापर्यंत भारतीय रेल्वेने सुमारे 7900 मेट्रीक टन द्रवरूप वैदयकीय प्राणवायू जवळपास 500 टँकर्सच्या सहाय्याने देशातल्या विविध राज्यांमधे पोहचवला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून दररोज सुमारे 800 मेट्रीक टन द्रवरूप वैदयकीय प्राणवायूचा देशभरात पुरवठा केला जात आहे. ऑक्सीजन एक्सप्रेसचा हा प्रवास वीस दिवसांपूर्वी 24 एप्रिल 2021 रोजी सुरु झाला. पहिल्या फेरीत महाराष्ट्राला 126 मेट्रीक टन द्रवरूप वैदयकीय प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला. हे पत्रक प्रसिद्ध होईपर्यंत, 462 मेट्रीक टन प्राणवायूचा पुरवठा महाराष्ट्रात करण्यात आला आहे.